भीमाशंकर

शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी भीमाशंकर आहे. पुण्यापासून 110 किलोमीटरवर असलेले हे तीर्थस्थान पश्चिम घाटात वसले आहे. भीमा नदीही याच परिसरात उगम पावते. शंकराने या ठिकाणी त्रिपुरासुराचा वध केला.

त्यानंतर आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे. हे देऊळ तुलनेने अलीकडच्या काळात बांधले आहे. याचा कळस नाना फडणवीस यांनी अठराव्या शतकाच्या सुमारास बांधला. शिवाजी महाराजही

या देवळात येऊन गेल्याचे सांगितले जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. मंदिराच्या मागे मोक्षकुंड आहे. तसेच घनदाट जंगल आहे. शेकरू हा खारीसारखा दिसणारा दुर्मिळ प्राणी येथे आढळतो.

जाण्याचा मार्ग :

पुण्यापासून 120 किलोमीटरवर. राज्य परिवहन मंडळाच्या बस सर्व ठिकाणांहून उपलब्ध.

वेबदुनिया वर वाचा