मैत्री हे जगातील सर्वात अतूट आणि प्रेमळ नाते आहे असे म्हणतात. यामध्ये दोन मित्र एकमेकांच्या सवयी समजून घेतात आणि एकमेकांना पसंत करतात. मैत्रीत दोन्ही मित्र आपापल्या भावना आणि विचार एकमेकांशी शेअर करतात. ही मैत्री कोणासोबतही होऊ शकते. मुलांचे मुलांसोबत तर मुलींचे आपल्या मैत्रिणींसोबत बहुदा धकून जातं परंतु जेव्हा मुला-मुलींचा प्रश्न येतो तेव्हा मुलांमध्ये काही वाईट सवयी असतात ज्या मुलींना अजिबात आवडत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. अशात आज आम्ही तुम्हाला मुलांच्या त्या वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या मुलींना अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल आणि जपायचं असेल तर या सवयींकडे नक्कीच लक्ष द्या आणि तुमच्या सवयी बदला. जर तुम्हाला तुमची मैत्री टिकवून ठेवायची असेल, तर तुम्ही या लेखात दिलेल्या रिलेशनशिप टिप्सचे पालन देखील केले पाहिजे.
सर्वत्र घाण पसरणे- मुलांच्या तुलनेत मुली त्यांची खोली, कपडे आणि इतर सर्व गोष्टी अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवतात. तर या सवयी मुलांमध्ये क्वचितच दिसतात. मुले अनेकदा त्यांचे कपडे आणि खोली अव्यवस्थित ठेवतात. अशा सवयी असलेल्या मुलांपासून मुली बहुतांशी दूर राहतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.