Relationship Tips : सासु-सासऱ्यांना प्रभावित करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (19:00 IST)
लग्नानंतर मुलीचे एक नाही तर दोन परिवार तयार होतात. लग्नानंतर मुलीला सासरी राहवे लागते. जिथे आई-वडिलांप्रमाणे सासु-सासरे असतात. सासरच्या लोकांसोबत नाते घट्ट करण्यासाठी एक सुरुवात करणे गरजेचे असते. एक मुलगी लग्नानांतर हेच अपेक्षित करत असते की घरी जसे तिला मान-सन्मान आणि प्रेम मिळते तसेच तिला सासरी पण मिळावे. लग्नानंतर सासु-सासऱ्यांना प्रभावित करण्यासाठी तसेच त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी मुलीने काही गोष्टींकडे लक्ष्य दिले पाहिजे . 
 
लहान मुलांसोबत प्रेमपूर्वक व्यवहार करणे- 
लग्नात नेहमी नातेवाईकांचे लहान मुले एकत्रित होतात. कदाचित तुमच्या सासरी दिरांचे किंवा नणंदेचे मुले असतील. जर घरात लहान मुले असतील तर गोंधळ हा असतोच लहान मुले गोंधळ करतात. पण त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे मुलीने वैतागुन जाऊ नये. शांत राहून मुलांना प्रेमाने समजवावे. आणि त्यांच्याशी प्रेमपूर्वक व्यवहार करावे. 
 
सासुला साथ देणे- 
एक चांगली सुन बनण्यासाठी गरजेचे आहे की सासुला साथ दयावी. सासुसोबत मैत्री करावी. म्हणजे सासुला बाहेर घेऊन जावे. सासुसोबत खरेदी करणे. सासुसोबत वेळ घालवावा. सासरी महिलांसोबत मुलीची मन जुळलेकी बाकी लोक पण संतुष्ट असतात.
 
कुशल गृहिणी बनणे- 
मुलीची नोकरी असो व नसो पण प्रत्येक सासु आपल्या सुनेत एक उत्तम गृहिणीचा गुण शोधत असते. सुन स्वयंपाक आणि घरकामात निपुण असली की, सासरचे लोक लगेच प्रभावित होतात. 
 
चांगले दिसावे- 
लग्नानंतर नवीन सुनेला पहायला लोक पाहुणे येतात. मुलीने चांगली तयारी करून चांगले दिसावे. व पाहुणे कौतुक करतील सासु-सासऱ्यांना सुनेचे कौतुक करतांना पाहून अभिमान वाटेल 
 
कोणाची निंदा करू नये-
सासरच्या मंडळींसामोर कोणाचीच निंदा करू नये, कोणाबद्द्ल वाईट बोलू नये. नातेवाईक, सासु, नणंद तसेच सासुसमोर नवऱ्याची चूक वारंवार बोलू नये. तसेच पति-पत्नी मधील वाद सासरच्या मंडळींसमोर आणु नये.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती