लोकांनी विवाहबाह्य संबंध ठेवण्याचे कारणे जाणून घ्या
सोमवार, 28 एप्रिल 2025 (21:30 IST)
वैवाहिक बंधन हे विश्वासावर आधारित आहे. लग्नानन्तर एक मेकांना समजून घेण्यासाठी वेळ लागतो. वैवाहिक नात्यात एकमेकांवर विश्वास असावा. वैवाहिक बंधनात जोडप्यांमध्ये मतभेद किंवा भांडण होणे सामान्य आहे. पण पती-पत्नींमध्ये तिसऱ्या व्यक्तीच्या आल्यामुळे विश्वास, आदर, आणि प्रेम तिघांवर परिणाम होतो.
सध्या विवाहबाह्य संबंध असल्याची अनेक प्रकरणे ऐकायला आणि बघायला मिळत आहे. पती किंवा पत्नीचे लग्नानन्तर देखील दुसऱ्या कोणाशीतरी प्रेम संबंध असतात. याला विवाहबाह्य संबंध म्हणतात.
विवाहबाह्य संबंध असण्याची अनेक कारणे असू शकतात परंतु बहुतेकदा ते नात्यात काहीतरी कमतरता असल्याचे लक्षण असते. हे टाळण्यासाठी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर संवाद साधणे, एकमेकांना समजून घेणे आणि नात्यात भावनिक जवळीक राखणे. आहे.
विवाहबाह्य संबंधाची काय कारणे असतात ते जाणून घेऊ या.
कधीकधी पती-पत्नीमधील संवाद कमी होतो किंवा ते एकमेकांना समजून घेणे थांबवतात. अशा परिस्थितीत, जेव्हा एखाद्याला त्यांच्या जोडीदाराशी भावनिकदृष्ट्या जोडलेले वाटत नाही, भावनिक अंतर जाणवते आणि तेव्हा ते तिसऱ्या व्यक्तीमध्ये ते नाते शोधू लागतात
कंटाळवाणी दिनचर्या असणे
लग्नाच्या काही वर्षांनंतर नात्यातील उत्साह कमी करू शकते. नीरस दिनचर्या, जबाबदाऱ्यांचे ओझे आणि वैयक्तिक वेळेचा अभाव यामुळे, काही लोक त्यांच्या आयुष्यात नवीनता आणण्यासाठी बाहेरील कोणाकडे आकर्षित होऊ लागतात.आणि विवाहबाह्य संबंध होतात.
प्रत्येक व्यक्तीला कधी न कधी कोणीतरी कौतुक आणि समजून घ्यावेसे वाटते. जेव्हा एखाद्याला असे वाटत नाही की त्याच्या जोडीदाराच्या आयुष्यात त्याला काही महत्त्व देत नाही. जेव्हा त्यांना असे वाटते की त्यांच्या भावनांची कदर केली जात नाही, तेव्हा ते अशा व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात जो त्यांना समजून घेतो आणि त्यांची कदर करतो.
सहकारी आणि सोशलमिडीया सोबत जास्त वेळ घालवणे
आजच्या काळात सोशल मीडियामुळे मैत्री वाढते तसेच ऑफिस मध्ये सहकाऱ्यांसोबत जास्त वेळ घालावा लागतो. आणि डिजिटल माध्यमांमुळे नवीन नाते संबंध जुळतात. मैत्री वाढते आणि प्रेमसंबंध वाढतात.