Happy Sisters Day 2022: भाऊ-बहीण किंवा मोठ्या आणि लहान बहिणींचे नाते खूप खास असते, आपण आपापसात कितीही भांडलो, पण एकमेकांशिवाय आपण राहू शकत नाही. आयुष्यात बहीण असणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे.
सिस्टर्स डेचा इतिहास
सिस्टर्स डेचा इतिहास 1996 चा आहे. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात मेम्फिस, टेनेसी, युनायटेड स्टेट्स येथील रहिवासी ट्रिसिया अॅलोग्राम यांनी केली. हा दिवस साजरा करण्यामागचा त्यांचा हेतू लोकांना बहिणींचा आदर करणे तसेच त्यांच्या अपार प्रेम आणि करुणेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा होता. जर तुम्हाला बहीण असेल तर तुम्ही भाग्यवान आहात पण बहिणींचे नाते हे फक्त रक्तानेच बनत नाही. म्हणून, तुम्ही हा दिवस तुमच्या चुलत भाऊ,बहिणी सोबतही साजरा करू शकता. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे क्षण बहिणीं शिवाय अपूर्ण असतात.ही एक बहीण आहे जी तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि जेव्हा प्रत्येकजण तुमचा हात सोडेल तेव्हा तुमच्यासोबत नेहमी तुमची बहीण असेल. त्यामुळे हा दिवस तुमच्या बहिणीसोबत नक्कीच साजरा करा.