मुलांच्या ऑनलाईन गेमवर नियंत्रण मिळवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (15:11 IST)
ऑनलाईन गेममुळे लहान मुलांचे मानसिक संतुलन बिघडेल त्यापूर्वी पालकांनी या पाच गोष्टी समजून घ्याव्या 
कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा असते. जिला जर पार केले तर नुकसान संभवते. अशा प्रकारे लहान मुलांमध्ये ऑनलाइन गेमिंग वाढती सवय त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सखोल परिणाम करते आहे.

ऑनलाईन गेम्सचा वेड मुलांवर अशाप्रकारे हावी झाला आहे की अभ्यास करण्याच्या तसेच काही नाविन्यपूर्ण  शिकण्याच्या वयात लहान मुले जास्त वेळ गेम खेळण्यात घालवतात. त्यांची ही सवय नाहीशी व्हावी म्हणून प्रयत्न करून थकले असाल तर इथे आम्ही तुम्हाला अश्या पाच गोष्टी सांगू की ज्याला तुम्ही अवलंबवून  
मुलांचे ऑनलाइन गेम खेळण्यावर नियंत्रण आणू शकाल. चला जाणून घेवू या पाच टिप्स बद्दल. 

गप्पा करा-
नेहमी जेव्हा आई-वडील मुलांना गेम खेळतात म्हणून रागवतात तेव्हा ते जास्त हट्टी बनतात. अनेकदा ते लपून छपून  ऑनलाईन गेम खेळतात किंवा पालकांना विरोध करायला लागतात जर तुमचा मुलगा पण असे करायला लागत असेल तर त्याला  रागवू नका तर त्यांच्यासोबत बसा त्यांच्याशी बोला आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करा की ते गेम कसे खेळतात. आणि त्यांना यात काय आवडते. लक्षात ठेवा की मुले जेव्हा तुमच्याशी मित्राच्या नात्याने संभाषण करेल तेव्हा ते तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतील. 
 
दिनचर्या  नियंत्रित करा- 
आई-वडील दोघांना आपल्या मुलांच्या दैनंदिनी बद्दल माहिती हवी खूप वेळेस मूल आपल्या रूम मध्ये बराच वेळ काय करते हे आई वडिलांना माहितच नसते. तुम्हाला त्यांच्या क्रियाकलपांवर थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. आणि हे समजून घ्या की एकाच दिवसात ते आपली ही सवय सोडवू नाही शकत या साठी थोडे प्रयत्न करावे लागणार. त्यांच्या सोबत बसून त्यांना नवीन काही शिकवा. असं केल्याने त्यांच्या ऑनलाईन गेम खेळण्याच्या या सवयीला वाढण्यापासून थांबवू शकाल. 
 
गेमची ऐज रेटिंग पहा- 
ज्या गेम्सला तुमचा मुलगा आवडीने खेळतो गूगल प्लेस्टोर वरून त्यांची ऐज रेटिंग पहा जर ती तुमच्या मुलाच्या वयाप्रमाणे नसेल तर त्यांना त्यामधील असलेला अंतर समजावून सांगा. आणि त्याकडे दुर्लक्ष करायला सांगा आणि लक्षात ठेवा की तुमची सांगण्याची पद्धत सौम्य ठेवा त्याच्यावर रागावू किंवा चिडू नका. मुलांना ऑनलाइन गेम खेळण्याचे नुकसाना बदद्ल इंटरनेटवर असलेले काही फैक्ट्स दाखवून समजवा.असं केल्याने  कदाचित तो तुमचे बोलने मनावर पण घेईल. 
 
हिंसक गेम खेळू देवू नका-
मुलांना खासकरून हिंसक आणि फाइटच्या गेम पासून दूर ठेवा हे त्यांच्या बुद्धिवर सखोल परिणाम करतात यांचा दुष्परिणाम एवढा असतो की मुलांचे मन हिंसक प्रवृत्तीचे होऊ शकते. तो संधी मिळाल्यास ते एखाद्या अपघाताला जन्म देऊ शकतो. या गेम्सला खेळून ते हिंसक आणि रागीट बनतात जिथे ते व्हर्च्यूवल आणि खऱ्या आयुष्यातील अंतर देखील विसरतात. 
 
स्वत:वर ही लक्ष द्या - 
जर तुम्ही तुमच्या मुलांना ऑनलाइन गेम्सपासून दूर राहायला सांगत आहात आणि स्वतः दिवसभर मोबाईल घेऊन बसाल तर ही गोष्ट तुमच्या मुलांवर वाईट परिणाम करू शकते आणि ते तुमचे देखील काहीच ऐकून घेणार नाही. लक्षात ठेवा की तुम्ही स्वतः देखील  त्यांच्या समोर या गेजेट्स पासून लांब रहा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती