मे महिना ढग, पाऊस, वादळ आणि दमट उष्णता अशा मिश्र हवामानात जाण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने १४ मे रोजी नागपूरसह विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या काही भागात यलो अलर्ट जाहीर केला आहे. तसेच पश्चिम विदर्भापासून उत्तर केरळ, मराठवाडा आणि अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्रसपाटीपासून १.५ किमी उंचीवर एक ट्रफ रेषा सक्रिय आहे, ज्यामुळे चक्रीवादळाची परिस्थिती कायम आहे.