Maharashtra Marathi Breaking News Live Today : पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, भारतीय जनता पक्ष देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी तिरंगा रॅलींचे आयोजन केले जात आहे. आज (१४ मे) ठाण्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे येथे भारतीय सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ आयोजित तिरंगा रॅलीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.