महामंडळाने जाहीर केलेल्या मेगाभरतीत 30% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या होत्या, त्यानुसार, 2406 पदावर महिलांची भरती होणार आहे. हलके वाहन चालवण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही भरतीसाठी अर्ज करु शकतात. तसेच महिलांसाठी उंचीच्या अटींमध्ये राज्याने सवलत दिली आहे. निवड प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिला उमेदवारांना एसटी महामंडळातर्फे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. यागोदर महिलांची उंची 160 सेंमी उंच असलेल्या उमेदवारांना भरतीसाठी पात्र धरले जात होते. आता उंचीची मर्यादा किमान 153 सेमी केली असून, आजपर्यंत 289 महिला उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी 163 महिला उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.