ते म्हणाले की, 'सीएसएमटी रेल्वे नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पण, यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली. त्यांनी सांगितले की स्फोटामुळे धूर निर्माण झाला आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर केला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कमी तीव्रतेचा स्फोट ऐकू आला. स्फोटामुळे डब्बा धुराने भरला, ज्यामुळे अनेक प्रवासी उतरण्यासाठी दाराकडे धावले. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.