सदर घटना सोमवारी घडली असून वाराणसीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानात एका महिला प्रवाशाने केबिन सदस्यांसोबत सीट बदलून गैरवर्तन केले. या विमानात 175 प्रवाशी होते या गोंधळामुळे फ्लाईट 29 मिनिटे उशिराने निघाले. या प्रवासात एका महिला प्रवाशाने क्रू मेम्बरला तिची सीट बदलून देण्यास सांगितले. क्रू मेम्बर ने तिला सीट नंबर 15 वर बसायला सांगितले.महिलेने नकार दिला आणि 15 मिनिटानंतर टॉयलेटला गेली आणि क्रू मेंबरसोबत शिवीगाळ आणि गैरवर्तन केले.
सुरुवातीला क्रू मेम्बर ने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले नंतर तिने शिवीगाळ सुरु ठेवले इतर प्रवाशांनी महिलेच्या वागणुकीबद्दल तक्रार केल्यावर तिला योग्य प्रक्रियेचे पालन करत महिलेला हूड पेसेंजर म्हणून घोषित केले. विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. क्रू मेम्बरच्या तक्रारीवरून महिलेच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता आणि विमान नियमांच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.