ठाणे पोलिसांनुसार, पलक तिचा मित्र पवन सोबत दुसरी मैत्रिण झोयाला मुंब्रा येथील अमृत नगर येथील तिच्या घरी सोडल्यानंतर घरी परतत होती. त्या दिवशी संध्याकाळी हे तिघेही फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी बाहेर जेवायला गेले होते. स्कूटर चालवणाऱ्या पवनने नंतर पोलिसात तक्रार दाखल केली आणि या अपघाताची माहिती दिली. त्यांनी सांगितले की ते रेतीबंदर वरून जात असताना नाशिकच्या दिशेने येणाऱ्या एका कंटेनर ट्रकने अचानक त्यांच्या स्कूटरला मागून धडक दिली. धडकेमुळे दोन्ही रस्त्यावर पडले, त्यानंतर कंटेनरचे मागचे चाक पलकच्या डोक्यावरून गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.