आम्हाला मत न दिलेल्या अपक्षांना निधी का द्यायचा? - विजय वडेट्टीवार

रविवार, 12 जून 2022 (10:44 IST)
राज्यसभेची निवडणूक 10 जूनला विधिमंडळात पार पडली. 285 आमदारांनी यासाठी मतदान केलं. सहाव्या जागेची लढत अटीतटीची ठरली. यात शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला तर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला.
 
महाविकास आघाडीकडे संख्याबळ आणि अपक्षांची साथ असूनही काही आमदार फुटले असा दावा नेत्यांकडून केला जातोय. अपक्ष फुटल्यानेच भाजपला फायदा झाला असंही महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत.
 
ज्या अपक्षांनी महाविकास आघाडीला मतं दिली नाहीत त्यांना निधी देणार नाही, अशी भूमिका आता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे.
 
ते म्हणाले, "अपक्ष आमच्यासोबत होते. पण दगाफटका झाला. आम्ही माहिती घेत आहोत असे कोणते आमदार आहेत. आमच्यासोबत राहून निधी घ्यायचा आणि मत विरोधकांना करायचं मग आम्ही निधी कशासाठी देऊ?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती