यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपुढे बसून अजित पवरांना 'चुकलो' असं का म्हणावं लागलं?

रविवार, 26 सप्टेंबर 2021 (11:56 IST)
"मी जिल्हाधिकारी म्हणालो का? आता एवढं कुठे शिकलोय मी.खूप दिवसांनी एवढी चूक झाली,"असं उपमुख्यमंत्री अजित पवार भर सभेत बोलले.
 
सातारा जिल्ह्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना 'मी पाच वर्षं जिल्हाधिकारी होतो' असं ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्याकडे चिठ्ठी पाठवली.त्यात लिहिलं होतं 'जिल्हाधिकारी नव्हे पालकमंत्री म्हणा.'
 
ही चिठ्ठी वाचताच अजित पवार म्हणाले, "खूप दिवसांनी अशी चूक झाली हो. यापूर्वी मोठी चूक झाली होती. त्याची किंमत मोजावी लागली. तेव्हापासून कानाला खडा लावला.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीपुढे बसलो आणि साहेब चुकलो म्हणालो."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती