पुण्यासाठी टेस्टिंग इनचार्ज IAS अधिकारी नेमा : अजित पवार

शनिवार, 4 जुलै 2020 (08:58 IST)
करोनाची साथ पुण्यात आटोक्यात का नाही येत? मुंबईत जर ही साथ नियंत्रणात येऊ शकते तर पुण्यात का नाही? असे प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाचण्यांसाठी आता नवा प्रशासकीय अधिकारी नेमा अशा कडक शब्दांमध्ये पुण्यातल्या अधिकाऱ्यांना खास आपल्या शैलीत सूचना केल्या.
 
काही रुग्णालयांमध्ये डॉक्टर कोविड कक्षांमध्ये जात नाहीत अशा तक्रारी आहेत. पुण्यात पुरेशा कोविड चाचण्या व्हाव्यात म्हणून पुण्यासाठी टेस्टिंग इनचार्ज IAS अधिकारी नेमा अशी सूचनाही अजित पवार यांनी केली. पुणे, पिंपरी चिंचवड या शहरांसह ग्रामीण भागांमधली करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे ही चिंतेची बाब आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून पुणे जिल्ह्यासाठी टेस्टिंग इनचार्ज नेमा. त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतेली एका अधिकाऱ्याची नेमणूक करा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती