महाराष्ट्रात कुठे पाऊस कुठे ऊन

गुरूवार, 24 मार्च 2022 (17:23 IST)
बंगालच्या उपसागरात (bay of bengal) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची (Low pressure area) तीव्रता आता कमी होत आहे. त्यामुळे बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारपट्टीला बसणारा संभाव्य धोका काहीसा कमी झाला आहे. असं असलं तरी दोन्ही देशाच्या किनारी भागात वेगवान वारे वाहत असून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत.  दोन दिवसांनंतर बंगालच्या उपसागरात मुसळधार पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होताच मराठवाड्यासह विदर्भातील कमाल तापमानात वाढ  नोंदली आहे.
 
मराठवाडा आणि विदर्भात उष्णता वाढत असताना, घाट परिसर, दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण महाराष्ट्रात मात्र ढगाळ हवामानाची   नोंद झाली आहे. पुढील आणखी चार दिवस कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा चढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती