हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून महाराष्ट्रात 10 जूनला दाखल होईल, तर पुढच्या दोन दिवसांत कोकणमार्गे मुंबईत मान्सूनपूर्व सरी कोसळतील. 15 दिवसांपूर्वी बंगालच्या खाडीवर चक्रीवादळ घोंघावले होते. त्याआधारे हवामान खात्याने मान्सूनच्या आगमनाची भविष्यवाणी केली होती. मात्र मागील काही दिवस नैऋत्य मान्सूनने हुलकावणी दिली. अखेर रविवारी त्याने केरळमध्ये जोरदार एंट्री मारली. 1 जूनपर्यंत केरळात मान्सून धो धो कोसळणार असल्याचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून पोहोचेल नंतर 15 जूनपर्यंत मध्यप्रदेशात धडकेल असा अंदाज हवामान खात्याने लावला आहे.