आणि लग्नात चर्चा फक्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची

सोमवार, 9 डिसेंबर 2019 (10:19 IST)
सत्तास्थापनेच्या नाट्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. माढ्यामधील शाही विवाह सोहळ्यात या दोघांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे हे दोघेही नेते एकत्र बसून चर्चा करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित असल्याचे दिसत आहे. 
 
विशेष म्हणजे मंगलाष्टके सुरु असताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. सोलापुरातील करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांचा मुलगा यशवंत शिंदे यांचा शाही विवाह आयोजित करण्यात आला होता. जिंदाल कंपनीच्या शेजारी, एमआयडीसी टेंभूर्णी या ठिकाणी हा शाही विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती