..... त्याला आपण तरी काय करणार?: उद्धव ठाकरे

बुधवार, 19 जुलै 2017 (11:31 IST)

मुंबईतील खड्डे, ठिकठिकाणी साचणारे पाणी आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही पाऊस जास्त पडत असल्यामुळे होत असल्याचे सांगत शेवटी पावसावर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खापर  फोडले आहे. मुंबईत पाऊसच इतका पडतो, त्याला आपण तरी काय करणार? असा उलटा सवाल त्यांनी विचारला. मुलुंडमध्ये कालिदास नाट्यगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. 

मुंबई महापालिका कायम टीकेची धनी होते. जरा काही झालं की बीएमसीवर खापर फुटतं. मुंबईत पाऊस जोरात पडतो, त्याला महापालिका तरी काय करणार? संपूर्ण पावसाळा कुठेही पाणी न तुंबता जाईल, असा विश्वासही उद्धव यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

गेल्याच आठवड्यात रेड एफएमची आरजे मलिष्कानं विडंबनपर गाणं करुन मुंबई पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. त्याला शिवसेनेच्या वतीनं किशोरी पेडणेकर यांनी गाण्यातूनच उत्तर दिलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सूचक उत्तर दिलं आहे.

वेबदुनिया वर वाचा