खेडच्या ज्या मैदानात काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती, त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांची सभा होणार असल्याने येथील भाषणात मुख्यमंत्री शिंदे काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला सायंकाळी पाच वाजता सुरूवात होईल.
उत्तर सभा असं या सभेला संबोधलं जात आहे. शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री शिंदे हे साडेसहाच्या सुमारास भाषणास उभे राहतील, असा अंदाज आहे.
मुख्यमंत्र्यांची आजची सभा कुणावर टीका करण्यासाठी नाही, तर कोकणाला दिशा देणारी ही सभा असेल, असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.
दरम्यान, विरोधकांच्या पोटात नुसती आग, मैदानात उतरला ढाण्या वाघ, अशी रामदास कदम यांची पोस्टर्स लावण्यात आली आहे. त्यामुळे रामदास कदम यांची तोफही आज कोकणात धडाडताना दिसणार आहे.