शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील मेळाव्यांमधील एकूण आवाज किती होता

गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (21:25 IST)
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तर वांद्रे-कुर्ला संकुलामधील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाच्या समर्थकांनी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका करण्यात आल्याचं चित्र प्रमुख नेत्यांच्या भाषणात पहायला मिळालं. मात्र या दोन्ही मेळाव्यांपैकी कोणत्या दसरा मेळाव्यामध्ये ध्वनीप्रदूषण अधिक होतं यासंदर्भातील अहवाल समोर आला आहे.
शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील मेळाव्यांमधील एकूण आवाज किती होता याबद्दलची माहिती आवाज फाऊंडेशन या संस्थेच्या अहवालामधून समोर आला आहे. आवाज फाऊंडेशनने जारी केलेल्या या अहवालानुसार दसरा मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यातील आवाज हा शिंदे गटातील मेळाव्यापेक्षा अधिक होता हे स्पष्ट झालं आहे. या वर्षातील सर्वाधिक आवाज यंदा दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवाजी पार्कमध्ये होता असं अहवालात म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंचा मेळावा झालेल्या शिवाजी पार्कमधील सरासरी आवाज हा १०१.६ डेसिबल इतका होता. त्याचवेळी बीकेसीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा सरासरी आवाज हा ८८ डेसिबल इतका होता.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती