केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरण काय आहे ?जाणून घ्या

मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (13:52 IST)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले.त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान मात्र त्यांचा गोंधळ उडाला.हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव? यावरून मुख्यमंत्री गोंधळलेले दिसले असं ते म्हणाले.
 
"बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल.त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती",असं वादग्रस्त वक्तव्य केलं नारायण राणे यांनी केलं आहे.
 
"देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चिड येणारी गोष्ट आहे,असंही राणे म्हणाले.सरकार कोण चालवतंय ते कळत नाही,सरकारला ड्रायव्हरच नाही",अशी टीका देखील त्यांनी केलीय. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे,असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला आहे.
 
राणेंची बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट आणि शिवसैनिकांकडून शुद्धीकरण
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी (गुरुवार,19ऑगस्ट) मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं होतं.मात्र, राणे निघून गेल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी स्मृतिस्थळाचं गोमूत्र आणि दुधानं शुद्धीकरण केल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकारामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पक्षाने या गोष्टीचा निषेध केला आहे.केंद्रीय मंत्री राणे यांनी गुरुवारी बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर जाणार आहे,असं जाहीर केल्यानंतर सुरुवातीला शिवसेनेकडून विरोध झाला होता.
 
'एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये घेऊ'
"एकनाथ शिंदे हे फक्त सही पुरतेच मंत्री राहिले असून आता ते शिवसेनमध्ये कंटाळले आहेत.त्यांना आम्ही आमच्यात घेऊ,"असं राणे म्हणाले काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
 
"एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सहीपुरते आहेत. 'मातोश्री'शिवाय ते एकही सही करू शकत नाहीत.ते कंटाळले आहेत.आमच्याकडे आले तर घेऊ,असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू," असा दावा राणेंनी या वेळी केला.
 
'सीएम-बीएम गेला उडत,आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका'
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान कुणीही अधिकारी उपस्थित नसल्यानं, राणेंनी संताप व्यक्त केला होता.तो सीएम बीएम गेला उडत.आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे.इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का?"असं राणे म्हणाले होते.
 
जन आशिर्वाद यात्रेतले मंत्री बाटगे;सामनातून राणेंना टोला दिला.
मोदी सरकारने त्यांच्या मंत्र्यांची जन आशिर्वाद यात्रा सुरू केली आहे.त्याजत्रेत विरोधकांना शिव्याशाप देण्याचं काम सुरू आहे.या जनआशिर्वाद यात्रेतलेअर्धे मंत्री हे विचार आणि आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत.म्हणजे काल परवा भाजपमध्ये घुसले आणि मंत्रिपदाची हळद लावून बोहल्यावर चढले.हे उपरे भाजपचा प्रचार करत आहेत.वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते या जत्रेत येड्याखुळ्यासारखे सामील झाले आहेत. सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर टीका करण्यात आली होती.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती