काय सांगता,मृत प्रेमींचे चक्क लग्न लावले

सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (14:47 IST)
मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील मुकेश आणि नेहा यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.परंतु घरात कसं सांगायचे आणि त्यात मुलाच्या घरी वधू संशोधन सुरु झालं.आपलं लग्न होणार नाही आणि आपण एकत्र येणार नाही असा विचार करत दोघांनी गळफास घेऊन आपले जीवन एकत्ररीत्या संपविले.ही घटना कळल्यावर दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रेमाला संमती देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी चक्क दोघांचे लग्न लावून अंत्यविधी केल्या. 
 
हा धक्कादायक प्रकार भडगाव जिल्हा जळगाव येथे घडला.मुकेश कैलाश सोनवणे वय वर्षे 22 राहणारे वाडे आणि नेहा बापूराव ठाकरे वय वर्षे 19 या मृतक असलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत. या दोघांचे काही दिवसापासून प्रेमसंबंध होते.या दरम्यान मुकेशला बघण्यासाठी मुलीवाले येणार होते.आपले लग्न होणार नाही असा विचार करून त्यांनी रविवारी सकाळी एका माध्यमिक शाळेत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.हे कळतातच तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले.दोघांचे मृतदेह बघून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.त्यांच्या दोघांवर शोकाकुल वातावरणांतअंत्यसंस्कार करण्यात आले.या पूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रेमाला मान्य करून दोघांचे लग्न लावून दिले.

त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे हे आम्हाला माहितीच नव्हते असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.या घटनेमुळे सम्पूर्ण गाव हादरून गेले आहे.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती