लस घेण्याची परवानगी मिळेल, त्यावेळी घेऊ आणि तुम्हाला देखील सांगू : अजित पवार

शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (16:30 IST)
"पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोनाची लस दिली जात आहे. आम्हाला ज्यावेळी लस घेण्याची परवानगी मिळेल, त्यावेळी घेऊ आणि तुम्हाला देखील सांगू", असं अजित पवार म्हणाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 
 
"सध्या लसीकरणाबाबत अनेक अडचणी आहेत. ग्रामीण भागात प्रमाण जास्त आहे. ६०/६५ टक्के लसीकरण झालं. मात्र शहरात २५/३० टक्के लोकांनीच लस घेतली. लोक ऐनवेळी निर्णय बदलतात. कोविन अॅपची समस्या आहे, अशी कारणं आहेत. खासगी डॉक्टर्सनाही लस द्यावी अशी मागणी आहे. त्याबाबतही निर्णय घेऊ", असं अजित पवार म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती