जो निर्णय सुप्रीम कोर्ट देईल तो मान्य करत आम्ही आगामी निवडणुकीला सामोरे जावू

सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (15:38 IST)
बहुमतातील शिवसेना ही आमच्याकडे आहे. आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यातील सर्व लोकप्रतिनिधी जे लोकांमधून निवडून आलेत. त्यांचे बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे चिन्ह आम्हालाच मिळालं पाहिजे. परंतु शेवटी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. जो निर्णय सुप्रीम कोर्ट देईल तो मान्य करत आम्ही आगामी निवडणुकीला सामोरे जावू असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
 
शंभुराज देसाई म्हणाले की, धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळेल मात्र समजा, न्यायालयाने वेगळा निर्णय दिला तर आमची सर्वबाजूने तयारी सुरू आहे. लोकांना ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन कोण पुढे चालले आहे. हे २ महिन्यात लोकांना पटलेले आहे. शेकडो लोक आम्ही जेव्हा मतदारसंघात जातो तेव्हा स्वागताला येतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे जातात तिथे दुतर्फा लोक स्वागत करतात. तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे असं म्हणतात त्यामुळे आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार असतील परंतु विचारांचे वारसदार आम्हीच आहोत असं त्यांनी सांगितले.
 
तसेच बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाताना नवीन चिन्ह लोकांपर्यंत रुजवण्यास वेळ लागेल. परंतु आम्ही ते लोकांपर्यंत घेऊन जावू. कष्ट करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही शाखाप्रमुख, बूथप्रमुखांपर्यंत शिवसेना पोहचवली आहे. त्यामुळे आम्हाला फारसी अडचण येणार नाही असा विश्वासही शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती