देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याबाबत सूचक विधान केलं आहे. राज्यात समान नागरी कायदा लागू व्हावा, यासाठी योग्य वेळी विचार करु असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. गुजरातमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. काही कारणांमुळे आपल्या देशात हे होऊ शकलं नाही. आता हा कायदा गोव्यात आहे. महाराष्ट्रही योग्य वेळी याचा विचार करणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उत्तराखंडमध्ये देखील हा कायदा लागू करण्यात येणार आहे. हिमाचल आणि गुजरात देखील करणार आहे. मला वाटतं हळूहळू सगळेच राज्य हे करणार आहेत. आज मी याबद्दल अधिकृत घोषणा करू शकत नाही. कारण कोणतीही अशी अधिकृत घोषणा करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.