माझ्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते त्यावेळी कपिल पाटील आणि शिक्षक भारती मदतीला धावून आले, त्यांनी स्वत:हून फोनवरून विचारणा करत पाठिंबा दिला. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करण्य़ाचा प्रयत्न करेन असा विश्वास देतो. आणि सध्या जे राजकारण सुरु आहे त्यावर आम्ही योग्यवेळी उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांनी दिली. तांबे पिता-पुत्रांवर काँग्रेस पक्षाकडून कारवाई केल्या नंतर सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी गेले 22 वर्ष संघटनेच्या माध्यमातून या देशात काम करतोय. 2000 साली मी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून कामाला सुरुवात केली.पुढे मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं.त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये काम केलं.युवक काँग्रेसचा राज्य अध्यक्ष म्हणून चार वर्षे काम केलं.असं या देशातील एकही राज्य नाही जिथे मी काँग्रेस पक्षाच्या संघटनेचं काम केलेलं नाही.चांद्यापासून बांद्यापर्यंत मी काम केलंय.मित्र जमवण्याचं काम केलं.अनेक राजकीय संस्था आणि संघटनांवर मी काम करतोय.म्हणूनच कपिल पाटील यांच्या मनामध्ये गेली अनेक वर्ष होतो. अनेकवेळा आमची चर्चा व्हायची.ते म्हणायचे की,तू इथून-तिथून उभं राहण्याचा प्रयत्न कर.पण राजकारण असतं.ते किती हे असतं हे आपण गेल्या चार-पाच दिवसांत टीव्हीवर पाहिलेलं आहे.खूप राजकारण झालंय त्या विषयावर आम्ही योग्यवेळी योग्य रितीने बोलूच.आता सध्या राजकारणावर बोलणार नाहीअशी भूमिका सत्यजित तांबे यांनी मांडली.