रिफायनरी प्रकल्पासाठी जोरदार मोर्चेबांधणी
रत्नागिरी : कोकणातील रिफायनरीबाबत आता काही सकारात्मक हालचाली होताना दिसत आहेत. परंतु, शिवसेनेची भूमिका अद्याप देखील स्पष्ट नसल्याने लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रम आहे. पण, त्याचवेळी शिवसेनेचे स्थानिक अर्थात राजापूर-लांजा या विधानसभा मतदारसंघातील आमदार राजन साळवी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र लिहिले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी कोयना धरणातील पाणी रिफायनरी प्रकल्पासाठी वळवावे, अशी मागणी केली आहे.