ड्रायविंग लायसन्स काढायचंय? मग आधी सिम्युलेटर प्रॅक्टिस नंतर परीक्षा

गुरूवार, 24 मार्च 2022 (21:48 IST)
नाशिक मध्ये आरटीओ कार्यालयात वाहन परवाना काढण्यासाठी सिम्युलेटर ची व्यवस्था करण्यात आली असून काही जिल्ह्यात त्यावर वाहनांची टेस्ट घेतली जात असली तरी नाशिकमध्ये केवळ त्याचा सराव म्हणून चाचणी घेतली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष वाहनावर चाचणी घेतली जात आहे. वाहन परवाना तसेच वाहनांचे पासिंग फिटनेस अशा वेगवेगळ्या प्रकारची कामे प्रादेशिक विभाग परिवहन विभागामार्फत केली जातात.
 
गेल्या काही वर्षात आरटीओ लायसन्स काढणे असो अथवा वाहनांची नोंदणी सर्वच कामे अत्यंत क्लिष्ट वाटत असायची मात्र आता त्यात काळानुरूप आधुनिकीकरण झाले असून त्यामुळे अनेक प्रकारे दिलासा वाढला आहे. शासनाने मोटर वाहन चालवण्याचा परवानासाठी आरटीओ कार्यालयात सिम्युलेटर देण्यात आले आहे. काही कार्यालयात यात सिम्युलेटरवर चाचणी घेतली जाते, मात्र नाशिकमध्ये केवळ चाचणी घेतली जाते आणि त्यातील निकालावरून त्याची उत्तीर्ण होण्याची क्षमता कळते. त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षा घेतली जाते.
 
साहजिकच सिम्युलेटर केवळ सराव किंवा परीक्षेची पूर्वतयारी म्हणूनच वापर केला जातो. त्यानंतर रस्त्यावरच नियमानुसार परीक्षा द्यावी लागते. सिम्युलेटर एक प्रकारचा गेम झोन प्रमाणे आहे. त्यातबरोबर स्वतःच्या गाडीचे पेट्रोल वाचते. मात्र नाशिकमध्ये येणाऱ्या सर्वानाच सिम्युलेटर आणि सर्व अन प्रत्यक्ष गाडी चालविण्याची परीक्षा द्यावी लागते. परंतु लायसन्स काढणे सोपे नसून त्यामुळे वाहन चालकांची परीक्षा होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती