लातूर मधील पहिले अवयव दान केलेल्या युवकाची आईचे मतदानावर बहिष्कार केले उपोषण

शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (10:31 IST)
लातूर जिल्ह्यामध्ये २०१७ च्या साली किरण लोभे या तरुणाचा मृत्यू झाला होता. या तरुणाच्या कुटुंबियांनी त्याच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. हृदय, मूत्रपिंड आणि डोळे दान करण्यात आले. लातूरमधली ही अवयव दानाची पहिलीच घटना होती. या घटने नंतर घरातील करता पुरुष गेला म्हणून, गरीब कुटुंबाला आधार देण्याचे आश्वासन आमदार, प्रशासन आणि नगरसेवकांनी दिले होते. मात्र असे कोणतेच आश्वासन कुणीच पाळले नाही. अडचणीत आलेल्या या कुटुंबाने आज मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यांनी शहरातील टाऊन हॉलच्या मैदानावर उपोषण सुरु केले. त्याला अनेकांनी साथ दिली. यात किरणची आई लताबाई, भाऊ सचिन आणि विकास सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी या कुटुंबाला भेटण्याचं आश्वासन दिलंय असं समजतं पण त्याला दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे एखाद्या घरातील व्यक्तीने जर समाज उपयोगी काम केले तर त्याला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. अवयव दान केल्याने अनेकांचे प्राण वाचतात, तर अवयव मिळाले नाही म्हणून देशात हजारो लोक मृत्यू मुखी पडतात, त्यामुळे  या कुटुंबाला मदत केली पाहिजे असे मत अनेक व्यक्त करत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती