उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. इथल्या एका चहाच्या हॉटेलमधून अचानक एक किंग कोब्रा साप बाहेर आला हॉटेलवरील साउंड बॉक्समधून हा साप बाहेर आला. सापाला पाहताच हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. आश्चर्याची बाब म्हणजे साउंड बॉक्समधून नाग-नागिनचे गाणे वाजत असतानाच साप बाहेर आला.
ही घटना मैलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर गावातील आहे. ओमप्रकाश यांचे येथे चहाचे हॉटेल आहे. रोजप्रमाणे शुक्रवारीही लोक चहा-नाश्ता करण्यासाठी ओमप्रकाश यांच्या हॉटेलवर पोहोचले. हॉटेलमध्येही गाणे वाजत होते. तेवढ्यात नाग-नागिनचे गाणे वाजू लागले, तेवढ्यात अचानक हॉटेलमधील साउंड बॉक्समधून एक किंग कोब्रा बाहेर येताना दिसला.
त्याला पाहताच हॉटेलमध्ये उपस्थित असलेले लोक घाबरले आणि तेथून बाहेर पडले. काही लोकांच्या मदतीने हॉटेल मालकाने सावधपणे साउंड बॉक्स बाहेर काढून ठेवला. त्यानंतर बचाव पथकाला याची माहिती दिली. ही गोष्ट लगेच गावात पसरली. सर्वजण कोब्रा पाहण्यासाठी हॉटेलजवळ आले. बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून सापाला तेथून ताब्यात घेतले