मुंबईमध्ये आयोजित अपर क्रस्ट फूड अँड वाईन शोमध्ये नव्या शेफ्स आणि मिक्सोलॉजिस्ट्ससाठीकलिनरी आणि मिक्सोलॉजि कॉम्पिटिशनचे आयोजन झाले. या शोला अग्रीकल्चरल अफेअर्स, यू.एस. कन्स्यूलेट जनरल, मुंबईसाठी सीनियर अग्रीकल्चरल अटॅची, श्री. अॅडम ब्रॅन्सन आणि इतर मान्यवरांनी उद्घाटन समारंभास उपस्थित राहून सुरुवात केली. या प्रसंगी बोलताना श्री. अॅडम ब्रॅन्सन म्हणाले, “या पाककलेच्या महोत्सवाचा एक भाग बनतांना मला अतिशय आनंद होत असून आमच्यासाठी भारत एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सर्वोत्कृष्ट उत्पादने आणण्याची धडपड करत आहोत. हा शो यू.एस. प्रीमियम अग्रीकल्चरल प्रॉडक्ट्सचा स्वाद व अनुभव घेण्यासाठी आमच्या ग्राहकांना एक चांगली संधी आहे.”