राज्यात पहाटेच्या वेळी गारवा जाणवतो, मात्र दिवसभर तापमानात चांगलीच वाढ होते. तसेच राज्याच्या बहुतेक भागांमधून थंडी गायब होत असून तापमानात वाढ होऊ लागली आहे. राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने काही दिवसांपूर्वीच हजेरी लावली होती. शेतकऱ्यांचं पाऊस आणि गारपीटमूळे मोठे नुकसान झाले. आता पावसाबद्द्ल महत्वाची बातमी समोर आली आहे.
तसेच राज्यामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी होत असून अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने काही दिवसांमध्ये विदर्भासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात 26 ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान विदर्भाच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसेच अवकाळी पावसाची शक्यता नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये वर्तवली आहे.
तसेच पुढील 3-4 दिवसांत देशातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तराखंडमध्ये तसेच जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.