Heavy rain during Diwali दिवाळीत पावसाचा जोर

शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (10:23 IST)
Heavy rain during Diwali  : राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकणातील दक्षिण भागात अवकाळी पावसाचे संकट आले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. 
 
विशेष म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी देखील लागत आहे. काही ठिकाणी चांगला मुसळधार पाऊस पडत आहे. तर कुठे गुलाबी थंडीची चाहूल देखील लागली आहे. एकूणच काय की राज्यात सध्या हिवसाळा सुरू आहे.
 
अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून आज देखील महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा दिवाळीची सुरुवात पावसानेच होणार असे चित्र तयार झाले आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 10 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती