राज्यावर पुन्हा अस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. याला मंदोस असे नाव देण्यात आले आहे. राज्यात पुढील आठवड्यात या चाकरी वादळाचा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या 12 डिसेंबर रोजी मुंबईत विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच 12,13,14 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
तसेच राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात कोकण , मुंबई, पुणे, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.