भारतीय सैन्य दलातील केज तालुक्यातील सुपुत्र उमेश नरसू मिसळ शहीद

बुधवार, 28 जून 2023 (13:29 IST)
केज तालुक्यातील कोळेवाडी गावाचे सुपुत्र उमेश नरसू मिसाळ भारतीय सैन्य दलात सुरतगड येथे देशसेवाचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. ते भारतीय सैन्य दलात 25 मराठा लाईफ इन्फ्रंटी बटालियन मध्ये कार्यरत होते. 
दोन वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. आठ महिन्यांपूर्वी ते वैवाहिक बंधनात बांधले गेले होते. ते एप्रिल महिन्यात नातेवाईकांच्या लग्नासाठी सुट्टी घेऊन आले होते. 1 मे रोजी ते सुट्टीवरून कर्तव्यावर रुजू झाले होते. सोमवारी त्यांना वीरमरण आले. ही माहिती त्यांच्या गावी  समजतात गावात शोककळा पसरली आहे. 
दोन वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीत ते सैन्य दलात भरती झाले. राजस्थान राज्यात सुरतगड येथे ते 25 मराठा लाईट इन्फ्रंटी बटालियन मध्ये कर्तव्यदक्ष होते. 
 
त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी कोल्हेवाडी येथे शासकीय वाहनाने आणण्यात येणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती