निवडणूकांच्या वेळी भाजपाने जनतेची फक्त दिशाभुलच केली, दिलेली आश्वासने खोटी - उद्धव ठाकरे

बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (16:08 IST)
दोन्ही ठाकरे बंधू सरकारव आणि भाजपावर जोरदार टीका करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहेत. राज्यात १८० तालुक्यात दुष्काळसद्रुष्य परस्थिती आहे या भागाचा दौरा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लातुरमध्ये आले होते. मराठवाड्यात दुष्काळाची तिव्रता जास्त आहे त्यामुळे राज्यसरकारने तात्काळ दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी ठाकरे यांनी केली. निवडणूकांच्या वेळी भाजपाने जनतेची फक्त दिशाभुलच केली आहे. आजपर्यंत दिलेली आश्वासने खोटी ठरली आहेत यामुळे आगामी काळात भाजपाला मतरुपी भिक घालू नका असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. 
 
विधानसभाच नाही तर लोकसभेवरही भगवा फडकवला जाणार असून आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवाय, राज्यात दुष्काळजन्य स्थिती असतानाही राज्याचे मुख्यमंत्री हातात पंचांग घेऊन दुष्काळ जाहीर करण्याचा मुहूर्त शोधत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.दरम्यान आज शहरात बुथप्रमुखांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते. भाजपने युतीबाबत अल्टीमेट दिल्यांनतरही त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावरच असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. आज लातूरमध्ये बुथप्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती