पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका : महाआघाडी अयशस्वी कल्पना

गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (12:08 IST)
काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडीचा घाट घातलाअसून ही एक अयशस्वी कल्पना आहे. यातील पक्ष हे एकेमेकांसोबत नेहमी भांडत असतात. मात्र, जेव्हा त्यांना सरकार स्थापण्याची एखादी संधी दिसते तेव्हा ते एकत्र येतात. याचे उदाहरण म्हणजे कर्नाटकमधील सरकार होय. यांचे असेच प्रयत्न आता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसाठी देखील सुरू आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी या लोकांची पार्श्वभूमी सर्वांना सांगावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
 
मोदी अ‍ॅपवरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही सुख वाटणारे आहोत, तर 'ते' समाज वाटणारे आहेत, अशी टीका त्यंनी काँग्रेसवर केली. आता 5 राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यासाठी हे छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तणावाचे वातावरण निर्माण करतील. एकेकांमध्ये भांडणे लावून देतील. 
 
मोदी म्हणाले, अटलजींनी सगळ्यांना विश्वासात घेऊन छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड राज्यांची निर्मिती केली होती. मात्र, काँग्रेसने तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यांची विभागणी केली आणि एकच भाषा बोलणार्‍या लोकांना एकमेकांचे शत्रू बनवून टाकले, असा आरोप केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती