आम्ही नेहमी शेतकऱ्यांसोबत आहोत : उद्धव ठाकरे

सोमवार, 15 मे 2017 (15:55 IST)

त्तेत असू किंवा विरोधात पण आम्ही नेहमी शेतकऱ्यांसोबत आहोत अस म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शिवसेनेच्या विदर्भातल्या शिवसंपर्क अभियानाला अकोल्यातून सरूवात झाली. यावेळी ठाकरेंनी शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्याच्या बाजूने बोललो की राजकारण करतो असं वाटतं. आजवर शेतकरी बोललाय का? ज्याच्यासाठी आम्ही बोलतो, पण आता त्या शेतकऱ्याने स्वत: बोलायला हवं, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना केलं. या दौऱ्यादरम्यान अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात असणाऱ्या 20 मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्याचसोबत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मतं जाणून घेतली जातील. या अभियानाचा शेवट 19 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे.

 

वेबदुनिया वर वाचा