नोटाबंदीच्या निर्णयावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा तलवार उपसली आहे. टोकाची भूमिका घेण्यास मी मागे पुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.
ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटप्रमाणे जनमत चाचणी घेतली जात आहे. पण जनतेचा कौल बघून तिकडच्या पंतप्रधानांनी पायउतार व्हायचा निर्णय घेतला होता. इथे तसे होणार आहे? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना भावूक होण्यात काय अर्थ आहे. तसेच सव्वाशे कोटी जनतेचा निर्णय एक व्यक्ती घऊ शकत नाही. नोटाबंदीआधी जनतेला विश्वासात घेणे गरजेचे होते, असेही उद्धव ठाकारे म्हणाले.