उद्धव ठाकरेंना मराठा नेतृत्व संपवायचंय - रामदास कदम

गुरूवार, 28 जुलै 2022 (08:25 IST)
"उद्धव ठाकरे यांना मराठा नेतृत्व मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांना ते संपवायचं आहे," असं वक्तव्य ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलं आहे.
 
"उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांवर चालण्याऐवजी शरद पवारांच्या विचारावर चालत आहेत. उद्धव ठाकरेंना मराठा नेतृत्वाला मोठं होऊ द्यायचं नाही, त्यांना संपवायचं आहे का? असा संशय मला येत आहे," असं कदम म्हणाले.
 
"मी असो, राणे असोत किंवा एकनाथ शिंदे, आमचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझ्या तोंडाला 3 वर्ष कुलूप लावण्यात आलं. बोलू दिलं नाही, भाषण करू दिलं नाही," असंही त्यांनी म्हटलं.
 
ते पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना रामदास कदम आणि योगेश कदम यांना संपवण्यासाठी सहा मिटींग झाल्या. या मिटींगला आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, विनायक राऊत उपस्थित होते. अशापद्धतीने तुम्ही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आम्हाला नाही तर शिवसेनेलाच संपवत आहात."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती