उद्धव ठाकरे यांचे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत मोठं वक्तव्य
शुक्रवार, 8 जुलै 2022 (17:36 IST)
राज्यात शिवसेनेचे अनेक नगरसेवक आता शिंदे गटात सहभागी होत आहे.आता शिंदे गटात खासदार देखील शामिल होण्याच्या चर्चा सुरु आहेत. आज शिवसेनेचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्त्वाची वक्तव्ये केली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे खासदारांसोबत बोलून ठरवेल,
त्यांच्या पत्रकारपरिषदेतले मुद्दे होते-
* पंढरपूरला या म्हणून मला वारकऱ्यांचे निरोप आले. पण, मी नंतर पंढरपूरला जाईन. या गदारोळात जाणार नाही
* शिवसेनेनं आजपर्यंत साध्यासाध्या माणसांना मोठं केलं. पण ज्यांना मोठं केलं ती निघून गेली. ज्यांनी त्यांना मोठं केलं ते आज कायम शिवसेनेसोबत आहेत.
* शिवसेना ही काय एखादी गोष्ट नाही. कुणीही ती पळून नेऊ शकत नाही.
* एक आमदार असो, की शंभर असो. कितीही आमदार गेले तरी पक्ष संपत नसतो. विधीमंडळ पक्ष आणि रस्त्यावरचा पक्ष वेगळा असतो.
* सर्वोच्च न्यायालयातील उद्याची केस ही देशात लोकशाही किती काळ टिकेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे देश चालणार आहे की नाही, हे सांगणारा उद्याचा निकाल असेल.
* सुरतेला जाऊन बोलण्यापेक्षा ते मला इकडेच बोलले असते तर बरं झालं असतं. त्यांना आजही आमच्याबद्दल प्रेम आहे, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.
* पण, गेली दोन-अडीच वर्षं ज्यांनी ठाकरे घराण्यावर टीका केली, विकृत भाषा वापरली, त्यांच्याविरोधात ही मंडळी काहीच बोलली नाही. ज्यांनी टीका केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत आहात. मग तुमचं प्रेम खरं आहे की खोटं आहे?
या शिवाय त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा द्यायचा की नाही असं खासदारांशी बोलवून ठरवू असे म्हणाले. राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे हे विधान महत्वाचं मानलं जात आहे.