'तुमचा नम्रपणा हीच तुमच्या आमदारांना चपराक' : एमआयएम

गुरूवार, 23 जून 2022 (08:57 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबूक लाइव्हमधून संवाद साधत बंडखोर आमदारांना समोरासमोर येऊन चर्चा करण्याचा सल्ला दिला.
 
गेले दोन दिवस सरकारसमोर राजकीय संकट उभं राहिलं आहे. एकनाथ शिंदे यांना एकामागोमाग एक आमदार जाऊन मिळू लागल्यावर हे संकट अधिकच गहिरे होत गेले.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या भावनिक आवाहनाचं एमआयएमने कौतुक केलं आहे, 'तुमचा नम्रपणा हीच तुमच्या पक्षातल्या बंडखोरांना चपराक आहे.'
 
'तुमच्याबद्दल माझ्या मनात असलेला आदर वाढला,' असं कौतुक एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. एकीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील असताना त्या जिल्ह्याच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करणं हा एक वेगळ्याच चर्चेचा विषय झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती