वाजत गाजत यावे परंतू दसरा मेळाव्याला गालबोट लागेल असे वागू नये, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केली आहे. माझ्या बहीणी, भावांनी आमच्या परंपरेला पुढे न्यायचे आहे म्हणून शिस्तीने वागावे. आमच्यावर कोणी बोट दाखविण्याची हिंमत करू नये, असे ठाकरे म्हणाले.
शुभ बोल नाऱ्या सारखे वागुयात. विजया दशमीच्या दिवशी माझ्या आजोबांनी पहिला मेळावा घेतला होता. कोरोनाच्या काळातील अपवाद वगळता हा मेळावा आजवर नियमित झालेला आहे. राज्य सरकार आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडेल, अशी अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या वादावर जो निकाल देईल तो देशाच्या लोकशाहीचे भविष्य ठरविणारा निकाल असेल असे ठाकरे म्हणाले. न्यायदेवतेवर मी संशय घेतलेला नाही असेही ते म्हणाले. आजचा हा लोकशाहीच्या विजयाचा दिवस आहे. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, असे ठाकरे म्हणाले. सदा सरवणकरांनी केलेल्या गोळीबारावरून विचारले असता मी आता मुख्यमंत्री नाहीय. आजच्या दिवशी राज्य सरकारवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सोपविली आहे. मी आमच्या वकिलांचे देखील आभार मानत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.