अजित पवार म्हणाले, “पहिल्यांदाच एवढा उत्साह शिवभक्तांचा दिसत आहे. तरुण वर्ग मोठ्या संख्येने उत्साहाने आले आहेत. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य आले आहे असं लोकांना वाटत आहे. इथे आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे, तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी काही कामांची माहिती दिली. तातडीचे 23 कोटी रुपये आवश्यक असल्याचं सांगितलं. त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असता, उद्धव ठाकरेंनीही तातडीने 23 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले”
“शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी आजच्या आज 23 कोटी मंजूर केले. चार विभागांना विभागून 23 कोटी रुपये मंजूर केले आहेत. वन विभाग, पुरातन विभाग, पीडब्ल्यूडीला 23 कोटी रुपये पाहिजे, ते दिले जातील”, असं अजित पवारांनी सांगितलं.