दुर्दैवी! दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (15:51 IST)
नाशिक: पाटे, तालुका चांदवड येथे संजय किसन तळेकर यांच्या दोन्ही मुलांचा शेततळ्यात पडुन बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांना ही दोनच मुले होती. दोघेही शाळकरी मुले असून शाळा बंद असल्याने ते आज शेतात शेळ्या वळत होते.
दरम्यान शेळ्या वळत असतानाच घरच्याच शेततळ्यात बुडून मुत्यू झाला. मोठा मुलगा ओम संजय तळेकर (वय १३ वर्षे, इ सातवी) साईल संजय तळेकर (वय ११ वर्षे. पाचवी) अशी दोघांची नावे आहेत.