नव्या गाडीने देवदर्शनासाठी निघाल्या कुटुंबावर काळाचा घाला, दोन ठार, आई- मुलगा गंभीर

गुरूवार, 9 जून 2022 (12:22 IST)
सातारा- देवदर्शनासाठी जाताना कवठेमहांकाळ येथे झालेल्या भीषण अपघात दोन जण ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडल्याची माहिती आहे.
 
माण तालुक्यातील कळसकरवाडी येथील स्वप्नील पवार यांनी काही दिवसांपूर्वीच नवीन कार खरेदी केली. सोमवारी गाडीचं पूजन करुन स्वप्नील आपल्या आई-वडील आणि चुलत्यांसह देवदर्शनासाठी निघाला. कुटुंबाने सर्वात आधी तुळजापूर येथे भवानीमातेचे दर्शन घेतलं नंतर पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेऊन ते ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी निघाले. मात्र कवठेमहांकाळ येथे पोहोचल्यानंतर चालक स्वप्नीलचं नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यात उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला धडकली. 
 
या भीषण अपघातात स्वप्नील पवार यांचे वडील आनंदराव शिवराम पवार (वय 68) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेले चुलते माणिक साहेबराव पवार (वय 58) यांनी रुग्णालयात नेत असताना वाटेत प्राण गमावले. या अपघात स्वप्नील आणि त्याची आईदेखील गंभीर जखमी झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती