पुणे ते नागपूर दरम्यान त्रि साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी धावणार

शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (15:41 IST)
मध्य रेल्वेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी पुणे ते नागपूर दरम्यान त्रि साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ०२०३५ त्रि- साप्ताहिक सुपरफास्ट विशेष पुणे येथून दिनांक ७ फेब्रुवारी२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी १७.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसर्‍या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल. ०२०३६ त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष नागपूर येथून दिनांक ६. फेब्रुवारी२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी १८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी ०९.०५ वाजता पोहोचेल. दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड जंक्शन, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ जंक्शन, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनी या ठिकाणी विशेष गाड्यांचे थांबे असणार आहेत. एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, सहा वातानुकुलीत तृतीय श्रेणी, ११ शयनयान आणि ४ द्वितीय श्रेणी आसन अशी संरचना असणार आहे.
 
पूर्णपणे आरक्षित सुपरफास्ट विशेष गाडी क्र. ०२०३५/०२०३६ साठी आरक्षण सामान्य भाडे दराने दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु होणार आहे. उपरोक्त विशेष गाडीच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार आहे. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती