पाच जिल्ह्यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या धावणार

बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (16:58 IST)
मध्य रेल्वेनेमहत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातंर्गत रेल्वेसेवा सुरू करण्यास मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात परवानगी दिली होती. त्यानंतर पाच जिल्ह्यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.
 
राज्य सरकारनं ३० सप्टेंबर रोजी मिशिन बिगिनसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करताना राज्यातील रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर अखेर पाच शहरांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ ऑक्टोबरपासून रेल्वेसेवा सुरू होणार असून, दररोज दोन्ही बाजूंकडून पाच स्पेशल ट्रेन धावणार आहे. या रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, पुणे, गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यांच्या दरम्यान धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती