कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, मात्र, अनेक गाड्यानां उशिर

बुधवार, 12 जानेवारी 2022 (15:14 IST)
कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथील कापसाळ दरम्यान इंजिनात बिघाड झाल्याने बंद पडलेली दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस मार्गस्थ झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र, अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. 
 
जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात चिपळूणनजीक बिघाड झाला होता. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.  रेल्वे बोगद्यातच जनशताब्दी बंद पडली. त्यामुळे दुसरे इंजिन येईपर्यंत गाडी एकाच ठिकाणी अडकून पडली होती. सुमारे तीन तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरु करण्यात यश आले.
 
दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचे  बिघडलेल इंजिन काढून दुसरे इंजिन बदलले आणि गाडी रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. या गाडीमुळे अडकलेक्या इतर गाड्या आणि थांबविण्यात आलेल्या सगळ्या गाड्या हळूहळू मार्गस्थ झाल्या आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती